पुणे: होर्डींग कोसळून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले आहेत. पैकी तिघांची प्रकृती चिंताजनक तर एका मुलीचा पाय तुटला आहे. घटनेला जबाबदार कोण? अजून किती दुर्देवी अंत पुणेकरांसाठी मांडून ठेवले आहेत? असे अनेक प्रश्न या दुर्देवी घटनेने उभे केले आहेत.